आयुक्त नितीन कापडणीस यांचे आवाहन, विसर्जनासाठी २७ ठिकाणी कुंड
सांगली/प्रतिनिधी
महापालिकेच्या वतीने गणेशमूर्ती विसर्जनासाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांमध्ये कृत्रिम विसर्जन कुंड, फिरते विसर्जन केंद्र तसेच कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एकूण सत्तावीस कृत्रिम विसर्जन कुंड, तीन फिरते विसर्जन केंद्र, सहा कृत्रिम विसर्जन तलावांचा समावेश आहे. तसेच २२ मुर्तीदान केंद्रही सुरू केले आहे. नागरिकांनी गणेश मूर्ती विसर्जनाच्या दिवशी नदीत मूर्तीचे विसर्जन न करता कृत्रिम कुंडात या मूर्तीचे विसर्जन करावे अथवा दान द्याव्यात. नदी प्रदूषण टाळावे, असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
गणेश मूर्ती विसर्जन तसेच निर्माल्य नदी पात्रात टाकल्याने नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा चव्हाट्यावर आला होता. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी कृष्णा नदीचे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी विसर्जन कुंड तसेच कृत्रिम तलाव आणि मूर्तीदान केंद्र सुरू केले आहे. यंदाही महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने या सुविधा तिन्ही शहरात चार प्रभाग समितीच्या कार्यक्षेत्रात सुरू केल्या आहेत. यामध्ये एकूण २७ कुत्रिम विसर्जन कुंड, तीन फिरते विसर्जन केंद्र, सहा कृत्रिम विसर्जन तलाव सुरु केले आहेत. तसेच २२ मुर्तीदान केंद्रही सुरू केले आहे.