वाळपई प्रतिनिधी
हिंदू संस्कृती मधील पवित्र उत्सव गणल्या जाणाऱया गणेश चतुर्थीच्या उत्सवासाठी सत्तरी तालुका सज्ज झाला आहे. एका बाजूने रोगाची निर्माण झालेली महामारी व दुसऱया बाजूने वाढती महागाई या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांना यंदाची गणेश चतुर्थी बऱयाच प्रमाणात फटका देणारी ठरणार आहे .महत्त्वाचे म्हणजे रोगाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांमध्ये दीड दिवसाच्या गणपतीचे पूजन होणार असून सत्तरी तालुक्मयातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव यंदा तीन दिवसांचा उत्सव साजरा करणार आहेत.
यंदा गणेश बाप्पांच्या मूर्तींचे दरांमध्ये वाढ दुसऱया बाजूने आर्थिक स्तरावर निर्माण झालेली चणचण यामुळे याचा प्रतिकूल परिणाम अनेक स्तरावर दिसण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही .या संदर्भात वेगवेगळय़ा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कलाकार व सर्व सामान्य नागरिकांनी या संदर्भाच्या वेगवेगळय़ा प्रतिक्रिया स्पष्ट केलेले आहेत.
माटोळी सामानाला अल्प प्रतिसाद
गणेश चतुर्थीच्या माटोळीच्या सामानाची विक्री करणारे कंरझोळ येथील बातू गावडे यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना यंदाचा बाजार पूर्णपणे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते वाळपईच्या शहरामध्ये माटोळी सामानाची विक्री करीत असतात. यंदाही त्यांनी आपला स्टॉल वाळपई शहरात लावलेला असून गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यंदा बऱयाच प्रमाणात फटका बसल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली .महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांचा पूर्णपणे अभाव यामुळे गेल्या अनेक दिवसापासून काबाडकष्ट करून रानात जाऊन जमविलेल्या वस्तूंची आवश्यक स्तरावर विक्री होत नसल्याचे त्याने स्पष्ट केलेली आहे. यामुळे यंदा आर्थिक स्तरावर गणेशचतुर्थीला बऱयाच प्रमाणात फटका बसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले .गणेश चतुर्थीच्या माटोळी सामानात वेगवेगळय़ा प्रकारच्या रानातील वस्तूंची विक्री त्यांच्याकडून होत असते. दरवषी ते जवळपास वीस ते पंचवीस हजार पर्यंत बाजारपेठेतील आर्थिक व्यवहार करीत असतात .यंदा मात्र हा व्यवहार निम्म्याने कमी झाल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. सत्तरी तालुक्मया सारख्या रानामध्ये रानटी फळांची मोठय़ा प्रमाणात उपलब्धता असते. यंदा मात्र याच अनुषंगाने मोठय़ा प्रमाणात फळांची जमवाजमव केली होती व त्या मानाने बाजारपेठेला बऱयाच प्रमाणात फटका बसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.









