सावंतवाडी /प्रतिनिधी-
गणेश चतुर्थी पूर्वी तालुक्यातील वीज वाहिन्या योग्य पद्धतीत दुरुस्त करा आणि चतुर्थीच्या कालावधीत अकरा दिवस कुठे वीज पुरवठा खंडित होता कामा नये याची दक्षता घ्या अशा आशयाचे पत्र आज सावंतवाडी येथील वीज वितरण च्या अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिले. तालुक्यात कोठे वीज पुरवठा खंडित होऊ दिला जाणार नाही असे आश्वासन अधिकाऱ्यांनी या वेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने उपअभियंता यांची भेट घेतली आणि निवेदन दिले. यावेळी उपजिल्हाप्रमुख राघोजी सावंत, गजानन नाटेकर आदी उपस्थित होते









