सावट कोरोनाचेः गणेशोत्सवाबाबत प्रशासनाकडून हवेत निर्देश ; जिल्हा प्रशासनाकडे मंडळांची मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी
महाराष्ट्राबरोबरच कोल्हापूर जिह्यातील वाढत्या कोरोना संसर्गामुळे यंदा 22 ऑगस्टपासून सुरू होणारा गणेशोत्सव कसा असेल, याची कोल्हापूरच्या गणेश मंडळांना धाकधूक लागली आहे. लॉकडाऊन शिथिलतेमुळे कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याचा समज मंडळांचा आहे. मात्र भविष्यात कोरोनाचा कोठून कसा संसर्ग होईल, याची भीतीही आहे त्यामुळे गणेशोत्सवाबाबत जिल्हा प्रशासनाने निर्देश जाहीर करावेत, अशी मंडळांची अपेक्षा असून, त्यासाठी प्रशासनाने जाणकारांची एक सावर्जनिक गणेशोत्सव समन्वय समिती गठीत करावी, अशी मागणी मंडळे करत आहेत.
पुणे, मुंबईनंतर कोल्हापुरात धुमधडाक्यात होणाऱया गणेशोत्सवाला मोठी सामाजिक कार्याची किनार आहे. विविध विषयांवर सजीव व तांत्रिक देखावे करत मंडळांनी कोल्हापुरात प्रबोधनाचा सेतूच तयार केला आहे. देखाव्याची गणेशभक्तांकडून होत असलेल्या प्रशंसेमुळे मंडळाचा हुरुप वाढतच आहे. मात्र यंदा गणेशोत्सवात मंडळांना हुरुप आणि हौसेला कोरोनाविरुद्ध लढाईसाठी आवर घालावी लागणार आहे.
कोरोनाचे सावट गडद होत गेले तर मात्र लॉकडाऊनची कालमर्यादाही वाढणारच आहे. त्यामुळे गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकांबरोबरच देखावे पाहण्यासाठी होणाऱया गर्दीमुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीनेच साजरा करणे योग्य होईल, अशी मंडळांमध्ये चर्चा आहे. तसेच प्रशासनाने गणेशोत्सव कशापद्धतीने साजरा करायचा, याची माहिती दिल्यास गणेशोत्सवाची तयारी करता येणार आहे, असा सूर मंडळांचा आहे. गणेश मंडळांची मोठी संख्या असलेल्या शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, जुना बुधवार पेठ, शाहूपुरी व राजारामपुरी आदी भाग एकत्र आल्यास कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण सोपे जाणार आहेत.
निर्देशमिळल्यासयोग्यहोईल
मंडळांना कोरोना बाधिताबरोबर नव्हे तर कोरोनाविरुद्ध लढायचे आहे. तेव्हा मुंबई, पुण्याच्या धर्तीवर जिल्हा प्रशासनानेही सावर्जनिक गणेशोत्सव समन्वय समिती लवकर गठीत करुन गणेशोत्सवाबाबतचे निर्देशही जाहीर करावेत. त्यामुळे मंडळांना निर्देशानुसार गणेशोत्सवाची तयारी करणे सोपे जाईल.
कपिलचव्हाण(अध्यक्षःराधाकृष्णतरुणमंडळ, शाहूपुरी)
कोरोनाउपचारासाठीनिधीमिळवितायेईल
कोरोनावर मात करण्यासाठी समन्वय समितीमार्फत मंडळांना एकत्र आण्याचे काम गणेशोत्सव समन्वय समितीच्या माध्यमातून होऊ शकते. या समितीमार्फत गणेशोत्सव साध्या पद्धतीने करुन कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी निधी देण्याचे आवाहन मंडळांना केल्यास पैशाची कमतरता भासणार नाही.
गणेशपाटील(अध्यक्षःडांगेगल्लीतरुणमंडळ, जुनाबुधवारपेठ)








