पालये / वार्ताहर
काँग्रेस पक्षाचे युवा नेते तथा समाजसेवक सचिन परब यांच्यातर्फे पालये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला टर्च फ्री सॅनिटायझर स्टॅण्ड,फेस शिल्ड मास्क व फेस मास्क आदी कोविड संरक्षण साहित्य वितरित करण्यात आले.दरम्यान कोविड 19 च्या महामारी काळांत गणेशोत्सव मंडळांनी मार्गदर्शक बनून लोकांमध्ये जनजागृती करावी असे आवाहन सचिन परब यांनी यावेळी केले.
यावेळी त्यांच्यासमवेत गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष कृष्णा नाईक, सचिव सत्यवान पालयेकर,खजिनदार राजेंद्र नाईक तसेच अन्य पदाधिकारी विनायक ऊर्फ यशवंत नाईक, विनोद घाडी, दशरथ परब, सुरेश नाईक, पांडुरंग ऊर्फ बुजी परब, संतोष घाडी, राजेश शेटगावकर तसेच मंडळाचे अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी श्री.परब यांनी मंडळाला आवाहन करताना सांगितले की, गणेशोत्सव मंडळांनी कोविड 19 च्या महामारी काळांत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शक बनण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी गांवांगावात गर्दीची ठिकाणे टाळणे,दुकानांत किंवा अन्य सामान खरेदी करण्यासाठी जाताना अंतर ठेवण्याची काळजी घेणे,मुखावरणाचा वापर करणे,स्वच्छता राखणे आदी सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वांचे योग्य व काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाच्या महामारीला पायबंद घालणे शक्मय असल्याचे श्री.परब म्हणाले व गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
मंडळाचे अध्यक्ष कृष्णा नाईक यांनी स्वागत केले व सचिव सत्यवान पालयेकर यांनी आभार मानले.









