ऑनलाईन टीम / मुंबई :
गणेशोत्सव जवळ येतो तशी चाकरमान्यांना आपल्या जाण्याची ओढ लागते. गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊनचे नियम कडक असल्याने अनेकांना गावी जाता आले नाही. मात्र यंदा चाकरमान्यांना कोकणात आपल्या गावी जाता यावे यासाठी सेंट्रल रेल्वेने विशेष 72 ट्रेन्सची सोय केली आहे. त्यासाठी 5 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि पनवेल येथून सावंतवाडी रोड/रत्नागिरीसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहे. सीएसएमटी ते सावंतवाडी रोड (रोज 36 विशेष), सीएसएमटी ते रत्नागिरी द्वीसाप्ताहिक (10 विशेष), पनवेल ते सावंतवाडी रोड आठवड्यातून तीनवेळा (16 विशेष ) आणि पनवेल ते रत्नागिरी (10 विशेष) या मार्गावर या गाड्या धावणार आहेत.
अधिक माहितीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा. सर्व गाड्यांचे आरक्षण गुरुवार, 8 जुलैपासून सुरू होणार असून प्रवाशांनी प्रवासी आरक्षण केंद्र तसेच आयआरसीटीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे.








