महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एसटीच्या विभाग नियंत्रकांकडे मागणी
प्रतिनिधी / कणकवली:
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त गावोगावी जाणाऱया एसटी गाडय़ा सोडण्याबाबतचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्राr यांनी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुंबईसह राज्यातील अन्य शहरांमधून या सणानिमित्त येणाऱयांसाठी प्रवासभाडे हे दीडपट स्वरूपातच असावे. तीन सीटच्या जागी दोन प्रवाशांना बसविण्यात यावे व दोन सीटच्या जागी एक प्रवासी अशी व्यवस्था करावी. प्रवासभाडे कमी आकारून जनतेवर होणारा आर्थिक भार कमी करण्यात यावा. गावोगावी जाणाऱया गाडय़ा सुरू कराव्यात. चाकरमानी भाविकांच्या येणाऱया गाडय़ा व गावागावात जाणाऱया गाडय़ांच्या वेळेची सांगड घालावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर, शांताराम सादये, दत्ताराम अमृते आदी उपस्थित होते.









