प्रतिनिधी/सांगली
कोरोनाचा हाहाकार अद्यापही संपलेला नाही. त्यामुळे गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने करण्याचे आदेश राज्यप्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार सांगली शहरात पाचव्या दिवशी कोणीही मिरवणुक काढू नये यासाठी सांगली शहरातील मुख्य बाजारपेठेसह खणभागातून पोलिसांनी संचलन केले. सांगली शहरात दुपारनंतर काही भागात जमावबंदीही जाहीर करण्यात आली आहे. तसेच सांगली संस्थानच्या गणपतीचेही साधेपणाने विसर्जन करण्यात येणार आहे.
सांगली शहरात पाचव्या दिवशी संस्थानची मिरवणूक पाहण्यासाठी मोठयाप्रमाणात गणेश भक्त येत असतात. पण सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत सुरक्षिततेचे नियम व सोशल डिन्स्टिसिंगचा फज्जा उडू शकतो त्यामुळे सांगली शहरातील काही भागात मंगळवारी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सांगली शहरात पोलिसांनी संचलन केले.