वार्ताहर / रामनगर
कारवारच्या प्रांताधिकारी विद्याश्री मंजरगी यांनी जोयडा व दांडेली तालुक्मयातील रिसॉर्ट मालकांची गणेशगुडी येथे बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी जोयडा व दांडेलीचे तहसीलदारही उपस्थित होते.
कारवार जिल्हा हा पर्यटकांसाठी प्रसिद्ध असून या ठिकाणी देश-विदेशातून पर्यटक येतात. सध्य कोरोना काळात सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करत येथील रिसॉर्ट मालकांनी आपले व्यवहार करावेत. तसेच बाहेरून आलेल्या पर्यटकांचा 72 तासाच्या आतील आरटीपीसीआर अहवाल घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आपल्या परिसरात सॅनिटायझर फवरणी करून आपला तालुका सुरक्षित ठेवावा. आलेल्या पर्यटकांनी मास्कचा वापर केला नाही तर त्या ठिकाणच्या रिसॉर्ट मालकांवर कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. तसेच या ठिकाणी राफ्टिंग करताना नियमांचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा अधिक पर्यटकांचे राफ्टिंग करण्यात येते. यामुळे यावर योग्य निर्णय होईपर्यंत राफ्टिंग बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला. या भागात चालणाऱया राफ्टिंगमुळेच येथे पर्यटक रिसॉर्टला येत असून ते लवकरात लवकर सुरू करून देण्याची मागणी या परिसरातील रिसॉर्ट मालकांनी प्रांताधिकाऱयांकडे केली आहे.
या बैठकीवेळी जोयडाचे तहसीलदार व दांडेली तहसीलदार यांच्यासह या परिसरातील रिसॉर्ट मालक उपस्थित होते.









