विष पिऊन संपविले जीवन
प्रतिनिधी / बेळगाव
गणाचारी गल्ली येथील एका युवकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. दारु पिवू नकोस असा कुटुंबियांनी सल्ला दिल्याने त्याने आपले जीवन संपविल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
मिथून मनोहर अप्पुगोळ (वय 41) असे त्याचे नाव आहे. 14 मे रोजी नशेत विष प्याल्याने तो अत्यवस्थ झाला होता. त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचाराचा उपयोग न होता बुधवारी त्याचा मृत्यू झाला आहे.
खडेबाजार पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक धिरज शिंदे पुढील तपास करीत आहेत. मिथून हा उद्यमबागला कामाला जात होता. सध्या तो कामावर नव्हता. दारु पिवू नकोस आता सुधार असा सल्ला कुटुंबियांनी दिल्यामुळे याच मनस्तापातून त्याने आपले जीवन संपविल्याचे सांगण्यात आले.









