कुडाळ / प्रतिनिधी
महाबळेश्वर ते धामणेर या चैापदरी हमरस्त्याच्सा कामामध्ये टेंडर व अंदाजपत्रकाच्या नियमावलीला फाटा देत वृक्षतोड करण्यात आले आहे. तोडलेल्या झाडांच्या पाचपट झाडे लावने बंधनकारक असताना देखील ठेकेदार गडोख यांनी अभियंता निकम यांना मॅनेज करून महाबळेश्वर धामणेर रस्त्याच्या बांधकामात मोठी अफरातफर केली आहे. याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे . महाबळेश्वर ते धामणेर या ३१० कोटी रुपायाच्या रस्ता बांधकामात १३०० झांडांची कत्तल झाली आहे.
धामणेर ते महाबळेश्वर रस्त्याच्या दुतर्फा तोडण्यात आलेल्या १३०० झाडांचा मोबदल्यात पाच पट झाडे पुन्हा लावण्याची ठेकेदार कंपनीने टेंडरमध्ये मान्य केले आहे . रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याकरीता शासनाकडून महत्वपूर्ण भूमिका उपअभियंता निकम यांची आहे . मात्र ठेकेदार व अभियंता याच्यामध्ये सेटलमेंट झाले असल्याने गडोख ठेकेदार कंपनीकडून कोणतीही कार्यवाही अद्याप केली नाही. कोट्यवधी रुपये झाडाच्या पुनर्रबांधणीकरिता असताना मलई हाणण्याचा उद्योग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता व ठेकेदार कपनींचा सुरु असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे .
Previous Articleस्पर्शविरहित स्वयंचलित तापमापक यंत्राची निर्मिती
Next Article दिग्गज लॉजिस्टिक कंपनी 15 टक्के वाहने करणार स्क्रॅप









