प्रतिनिधी / गडहिंग्लज
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या सुचनेनूसार गडहिंग्लज शहरातील दि. १५ आक्टोबर रोजी होणारा ऐतिहासिक दसरा सोहळा रद्द करण्याचा निर्णय पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
त्यामुळे दसरा चौकातील उद्या होणारा सीमोल्लंघनाचा सोहळा रद्द केला आहे. पालखी व सीमोल्लंघन पाहण्यासाठी हजारो नागरिकांची उपस्थिती असल्याने खबरदारी घेण्यात आली आहे. गेल्यावर्षी देखील हा सोहळा रद्द करण्यात आला होता. यंदा देखील प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती खातेदार सुधीर पाटील यांनी दिली. या बैठकीला पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके यांच्यासह मंडल अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते.









