आगीत जळून खाक झालेले साहित्य
प्रतिनिधी/गडहिंग्लज
वडरगे मार्गावरील लक्ष्मण आण्णाप्पा बंबलाडे यांच्या घराला आग लागून सुमारे 10 लाखाचे नुकसान झाले आहे. रविवारी पहाटे 4 च्या सुमारास आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. बंबलाडे यांच्या या घरात अगरबत्ती, विद्यूत साहित्य, औषध दुकानाचे साहित्य, फर्निचर, फ्रीज, संगणक, शेतीची अवजारे जळून खाक झाले आहे. बंबलाडे यांच्याकडे अगरबत्ती आणि विद्यूत साहित्य पुरवठयाची एजन्सी असल्याने या घरात सर्व साहित्य साठवले होते. नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. याबाबत संबंधीत विभागाने पंचनामे करणे सुरू केले आहे.









