प्रतिनिधी / गडहिंग्लज
गडहिंग्लज शहरात कोरोनाचे रूग्णसंख्या वाढते आहे.याचे चिंता व्यक्त होत असताना लॉकडाऊनबाबत गुरूवारी दुपारी व्यापाऱयांची व्यापक बैठक पार पडली. या बैठकीत लॉकडाऊन न करण्याचा निर्णय झाला. मात्र दररोज सकाळी 9 ते दुपारी 5 पर्यंतच शहरातील दुकाने खुली ठेवण्याचा निर्णय झाला. तर प्रत्येक मंगळवारी कडकडीत बंद पाळण्याचे ठरविण्यात आले.
गडहिंग्लज शहरात कोरोनाचे रूग्णसंख्या वाढते आहे त्यामुळे शहरात लॉकडाऊन होणार अशी गेले दोन दिवस चर्चा होती. आजरा, कोवाड, हलकर्णी, महगाव, नेसरी आदी गावे पुर्णपणे लॉकडाऊन निर्णय झाला आहे. या पार्श्वभुमीवर गडहिंग्लज शहरातील लॉकडाऊन होईल अशी चर्चा होती. पण याला आजच्या बैठकीत पुर्णविराम देण्यात आला आहे. आज दुपारी गडहिंग्लज शहरातील किराणा भुसार, हॉटेल, सराफ, टेलर, हार्डवेअर, कापड, नाभिक यासह अन्य संघटनाच्या प्रतिनिधीची बैठक झाली.
या बैठकीत शहरातील वाढती कोरोना रूग्णसंख्या यावर व्यापक चर्चा झाली. व्यापाऱयांनी स्वतःची दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आले. लॉकडाऊन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण शहरात सकाळी 9 ते सायंकाळी 5 याच वेळेत दुकाने उघडी राहणार आहेत. प्रत्येक मंगळवारी कडकडीत बंद पाळण्याचे ठरविण्यात आले. कोरोना रूग्णसंख्येचा आलेख वाढता राहिल्यास पुढील बैठकीत निर्णय घेण्याचे ही ठरविण्यात आले. नगरसेवक महेश कोरी, नगरसेवक राजेश बोरगावे, प्रविण पावले, अमर दड्डी, योगेश शहा, युनूस नाईकवाडे, संदीप झेंडे, रामदास कुराडे, अवधूत पाटील, श्री. खोत, गुरूनाथ घुगरी आदी उपस्थित होते.









