जिल्हा प्रमूख विजय देवणे यांचा विश्वास
प्रतिनिधी / गडहिंग्लज
गडहिंग्लज नगरपालिकेत गेल्या काही निवडणूकीत एकहाती सत्ता मिळाली नसल्याने आघाडी करतच सत्ता स्थापन झाल्या आहेत. शहराच्या विकासासाठी शिवसेना कटिबध्द असून राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू आहे. यामुळे नगरपालिकेच्या सत्तेत यापूढे शिवसेना देखील वाटा घेणार असल्याचा विश्वास जिल्हाप्रमूख विजय देवणे यांनी व्यक्त केला.
गडहिंगलज `आपली समस्या आमची जबाबदारी शिवसेना आपल्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी बोलताना जिल्हा प्रमूख श्री. देवणे म्हणाले, शहरातील प्रश्न दिवसेदिवस गंभीर होत आहेत. रिंगरोड, सांडपणी शुध्दीकरण, वाहतुकीची कोंडी, बेघरांचा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचा विश्वास देत या उपक्रमाअंतर्गत शिवसेना आता घराघरात पोहचणार असल्याचे सांगितले.
शहराच्या विकासासाठी पक्षीय पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे सांगत जुन्या शिवसैनिकांना बरोबर घेत चोकटीतून बाहेर पडत साम, दाम, दंड, भेदचा वापर करत शहरात शिवसेना वाढवाणार असल्याचे मत शहर प्रमूख संतोष चिक्कोडे यांनी मत व्यक्त केले. शिवसेनेचे संघटक संग्रामसिंह कुपेकर, सहसंपर्क प्रमूख प्रा. सुनिल शिंत्रे, उपजिल्हा प्रमूख प्रभाकर खांडेकर, पक्ष निरीक्षक दिनकर जाधव, तालुका प्रमूख दिलीप माने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेविका श्रध्दा शिंत्रे, शारदा जाधव, वनिता जाधव, रियाज शमनजी, संभाजी पाटील, वसंत नाईक, प्रतिक क्षीरसागर, अवधूत पाटील यांच्यासह अन्य उपस्थित होते.