गडहिंग्लज तालुक्यातील चित्र : 24 तासात 54 मीमी पाऊस : ऊस तोडणीला अडचण, रब्बी हंगामही धोक्यात
प्रतिनिधी / गडहिंग्लज
गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसातून सावरलेले शेतकरी बुधवारपासून सुरु झालेल्या जोराच्या अवकाळी पावसामुळे साऱयांची दैना उडाली आहे. खरीपातील भात मळण्या रेंगाळाल्या असून ऊस तोडणीला अडचणी आल्या आहेत. खरीपाची पिक काढल्यानंतर रब्बीची पेरणी केली जाते. पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने रब्बी हंगामही धोक्यात येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. गडहिंग्लज तालुक्यात 24 तासात 54 मीमी इतका पाऊस झाला असून आज अखेर 1229 मीमी पावसाची नोंद झाली आहे.
यावर्षी पावसाने शेतकऱयांची पाठ सोडली नाही. पावसाळÎातही जोरदार पाऊस झाला. याचा उपयोग पिकासाठी झाला. खरीपाची पिक काढणी सुरू झाली. भात मळणी, भुईमूग काढणी, सोयाबिन मळणी, मिरची तोड ही कामे सुरू झाली. त्यातच गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्यानंतर धावपळ करत शेतकऱयांनी सुगीसाठी धडपड केली. अद्यापही भात मळण्या शेतात आहेत. गेल्या आठवड्यात उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा बुधवारपासून जोरदार हजेरी लावली आहे. पावसाळÎात होणाऱया पावसापेक्षा अधिक पाऊस काल आणि आज गडहिंग्लज परिसरात झाला आहे. त्यामुळे भाताच्या मळण्या रेंगाळल्या आहेत. ऊसतोड वेगाने सुरू असून या पावसामुळे ट्रक्टर शेतात जाणे अडचणीचे झाल्याने तोडी थांबल्या आहेत. तोडलेला ऊस मोठा खर्च करून शेतकऱयाला रस्त्यावर आणून टॅक्टरमध्ये भरावा लागत आहे. पावसाची चिन्हे अद्याप कायम असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. खरीपाची पिक काढणीनंतर गडहिंग्लज तालुक्यात गहू, ज्वारी, सोयाबीन, हरभरा ही प्रमूख पिके घेतली जातात. शेतातच पाणी झाल्याने पेरणी करणे अवघड झाले आहे. सद्यस्थितीत पावसाचे असणारे प्रमाण विचारात घेता किमान 15 पंधरा दिवस रब्बीच्या पेरणीसाठी रान तयार होईल असे दिसत नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे.
महागाव परिसरातील शेतकरी हवालदिल
महागाव : महागाव आणि परिसरात रब्बी हंगामातील पिकांची लागवड मोठÎा प्रमाणात केली आहे. परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे व थंडीचे प्रमाण कमी झाल्याने रब्बी हंगामातील पिकांवर कीड रोगाचा मोठÎा प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून पिके धोक्यात आली आहेत. त्यातच संततधार पावसामुळे शेतकऱयांना आपला ऊस कारखान्यापर्यंत कसा पोचवायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाने तालुक्यातील रब्बी हंगामाचे काही प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच आता ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. महागाव परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठÎा प्रमाणात असल्याने आंतरपीक म्हणून कांदा, हरभरा, मिरची, गहू अशी पिके घेतली जातात. तसेच काही शेतकऱयांनी या हंगामात ज्वारी, सोयाबीन, वाटाणा, मसूरसह वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य तसेच वांगी, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी यांच्यासह वेगवेगळ्या पालेभाज्यांची लागवड केली आहे. सध्याच्या वातावरणामुळे आशा पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱयाला पीक चांगले येण्यासाठी वेगवेगळÎा कीटकनाशकांचा वापर करावा लागत आहे. तसेच काजू, फणस या नगदी फळ झाडावरील मोहर या वातावरणामुळे गळून पडत आहे. महागाव परिसरात बुधवारी सायंकाळपासून संततधार पावसामुळे नवीन लागण केलेल्या ऊसाला फायदा आहे, पण ऊस तोडणी झाल्यानंतर पावसामुळे बुरशी, कीड यामुळे ऊस उगवणीची समस्या निर्माण होत आहे. तसेच तोडलेला ऊस फडातून कारखान्यापर्यंत पोहोचेपर्यंत शेतकऱयाच्या व ऊसतोड कामगारांच्या जीवात जीव नाही. काही ठिकाणी शेतकऱयाला फडातून ऊस रस्त्यावर आणून द्यावा लागत आहे. त्यासाठी त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बीड, नांदेड, जालना, उस्मानाबाद या भागातून आलेल्या ऊसतोड मजुरांचे पावसामुळे प्रचंड हाल होत आहे.
अवकाळी पावसाने हलकर्णीचा आठवडी बाजार विस्कळीत
हलकर्णी : येथे मध्यवर्ती बाजारपेठेचा बुधवार हा आठवडी बाजार दिवस होता. दुपारी पाच वाजता अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने संपूर्ण बाजार विस्कळीत झाला. उघडÎावर कापड दुकान मांडलेले व्यापारी, फळ विक्रेते, भाजीपाला, जीवनाश्यक वस्तूची विक्रेते यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. व्यापाऱयांनी ताडपत्रीच्या छताची पाले मारली होती. परंतू सर्वबाजूने खुल्या राहिल्यामुळे साहित्य भिजण्याचे प्रकार घडले. हलकर्णीचा बाजार दिवसभर चालायचा पण बाजाराचा ट्रेंड बदलला आहे. व्यापारी जरी सकाळी आले तरी पंचक्रोशीतील ग्राहक दुपारी दोननंतरच बाजारात दाखल होतात. बाजारात गर्दी होत असतानाच पावसाने हजेरी लावल्यामुळे उलाढाल ठप्प झाली.
Previous Articleऔंध परीसरात अवकाळीच्या तडाख्याने ज्वारी भूईसपाट
Next Article कुदनूरसह परिसरात एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं !









