प्रतिनिधी / गडहिंग्लज
गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी येथे झालेल्या वादळी पावसात पोल्ट्री शेडची भिंत कोसळून दुर्घटना झाली. यामध्ये दोन महिलांसह तिघांचा जागीच मृत्यू झाला. आज दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. अजित अर्जुन कांबळे (वय 48, रा. नांगणूर ), संगिता बसाप्पा कांबळे (वय 45) आणि गिरीजा अशी मृतांची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, अजित कांबळे यांची बहिण गिरीजा हिच्या पतीचे निधन झाले आहे. त्यामुळे ती माहेरी नांगनूर येथे राहते. गुरुवारी अजित, गिरीजा व त्यांच्या दुसर्या भावाची पत्नी संगीता कांबळे हे तिघे गिरीजाच्या सासूला पाहण्यासाठी हरळी येथे गेले होते. तेथून नांगणूरकडे परतत असताना जोरदार पावसाला पावसाला सुरुवात झाली. पावसापासून बचावासाठी त्यांनी मुगळीपासून जवळ असलेल्या असलेल्या भीमा शंकर माने यांच्या पोल्ट्रीजवळ आसरा घेतला. यावेळी वादळाच्या वेगाने नूल मार्गावर असणाऱ्या पोल्ट्रीची भिंत अचानक कोसळून तिघेही गाडले गेले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Previous Articleविनामास्क प्रवाशांकडून रेल्वेने वसूल केला सव्वा लाखांचा दंड
Next Article ‘लेबर लॉ’च्या पेपरमधील नापास विद्यार्थी झाले पास !









