क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
गडहिंग्लज येथे जेसीपीए आयोजित 14 वर्षाखालील जेसीपीए चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय अकादमी संघाने जीसीटीसीए गडहिंग्लज संघाचा 15 धावाने पराभव करून विजेतेपद पटकाविले. साईराज साळुकेला सामनावीर तर आशुतोष हिरेमठला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
अंतिम सामन्यात विजय अकादमी बेळगाव संघाने 25 षटकात 9 बाद 144 धावा केल्या. आशुतोष हिरेमठने दमदार फलंदाजी करत 8 चौकारासह 50, स्वरूप साळुंकेने 20, स्वाती भाटेने 15, स्वयं वड्डेबैलकरने 14 धावा केल्या. गडहिंग्लजतर्फे शुभम पेडणेकरने 3, नैतिक व शुभम साळवेकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल गडहिंग्लज संघाचा डाव 25 षटकात 129 धावात आटोपला. स्वयं मागोरेने 44, नैतिकने 22 धावा केल्या. विजयातर्फे साईराज साळुंके, बिलाल मुन्नूरवाले यांनी प्रत्येकी 3, स्वाती भाटेने 2, तर गौरव पाटील व स्वरूप साळुंके यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. विजया अकादमी व उपविजेत्या जेसीटीसीए गडहिंग्लज संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर साईराज साळुंके, बेळगाव, उत्कृष्ट गोलंदाज स्वरूप साळुंके, उदयोन्मुख खेळाडू स्वाती भाटे, इम्पॅक्ट प्लेयर बिलाल मण्णूरवाले, मालिकावीर आशुतोष हिरेमठ यांना गौरविण्यात आले.









