प्रतिनिधी / गडहिंग्लज
गडहिंग्लज येथील कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आलेल्या ३२ वर्षाच्या युवकाने आत्महत्या केली. कोविड केअर सेंटरमधील बाथरूममध्ये आज दुपारी त्याने हा प्रकार केला. दोन दिवसापासून तो येथे दाखल होता. त्याचा आज सकाळीच कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे त्याला दुपारनंतर घरी सोडण्यात येणार होते. त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट नसून नोंद गडहिंग्लज पोलीसात करण्यात आली आहे.
Previous Articleचीनकडून ‘तिआनवेन-1’ मंगळ मोहिमेचे प्रक्षेपण
Next Article लॉकडाऊनमुळे बाप्पाही झाले ऑनलाईन








