शासकीय कार्यालये खासगी कंपनीकडे देण्याचा केंद्र सरकारचा घाट
गडहिंग्लज / प्रतिनिधी
वीज उद्योगांचे खाजगीकरण व धोरणांच्या केंद्र सरकारच्या विरोधात व उत्तर प्रदेश येथे सुरू केलेल्या वीज कंपनी खाजगीकरणाच्या विरोधात आज सोमवारी महाराष्ट्र राज्यातील वीज कर्मचारी व अभियंते यांच्या २५ संघटनांच्या कृती समितीच्या वतीने गडहिंग्लज येथे द्वारसभा घेऊन निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला. शासकीय कार्यालये खाजगी कंपनीकडे चालविण्यास देण्याचा केंद्र सरकारचा घाट आहे. येऊ घातलेले खाजगीकरणाचे धोरण ग्राहक व कर्मचारी या दोन्हींच्या दृष्टीने मारक आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने हे धोरण मागे घ्यावे याबद्दल कर्मचाऱ्यांनी covid-19 नियमांचे पालन करीत निदर्शने व्यक्त केली.
यावेळी सब ऑर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशनचे विभागीय अध्यक्ष सागर दांगट, वर्कर्स फेडरेशनचे विभागीय सचिव सादिक देसाई, तांत्रिक संघटनेचे श्री दोडके, महासंघाचे श्री मयेकर यांच्यासह इतर संघटनांचे पदाधिकारी व वीज कर्मचारी अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









