प्रतिनिधी / गडहिंग्लज
गडहिंग्लज येथील मडलगे ज्वेलर्समध्ये तब्बल 3 लाख 21 हजारांचे सोन्याचे विविध दागिने खरेदी करून त्याचे पेमेंट ऑनलाईन केल्याचे दाखवत पसार झालेल्या रणधीर राजेंद्र भोसले (सांगली) याच्या विरोधात गडहिंग्लज पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. मडलगे ज्वेलर्सचे मॅनेजर रावसाहेब अरूण कुरळे (वय 38, रा. शेंद्री रोड गडहिंग्लज) यांनी याची फिर्याद दिली आहे.
शहरातील मडलगे ज्वेलर्समध्ये रणधीर भोसले याने रविवारी 3 लाख 21 हजार इतक्या रक्कमेची विविध स्वरूपातील दागिने खरेदी केली. त्याने ऑनलाईन पेमेंट केल्याचे दाखवत याचा मॅसेज ज्वेलर्स मधील कामगाराला पाठवला. याबरोबर 200 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिन्याचे ऑर्डर दिली. खरेदीची दोन्ही रक्कमा खात्यावर जमा झाली नसल्याने दिसून आल्यावर फसवणूक झाल्याचे दिसून आले. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. घुगे हे करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









