उचगांव /वार्ताहर
गडमुडशिंगी ता करवीर येथे ओढ्यात धुणे धुण्यासाठी गेलेल्या मिनाक्षी येडेकर आणि अनुराधा येडेकर या सासू सुनेचा विजेच्या तारेचा धक्का बसून मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी येडेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले व तातडीची ४० हजार रुपयांची मदत महावितरणकडून देण्यात आली असून शासन स्तरावरही मदत मिळवून देण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.
येडेकर सासु-सुनेचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला. तेथील पाहणी ऋतुराज पाटील यांनी केली व महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. ओढ्यावरील तुटलेल्या वीजेच्या तारा व परिसरातील झुकलेल्या तारा व खांब दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या.करण्यात याव्या , तसेच झुकलेले डांब सुरळीत करावेत अशा सुचना केल्या. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊ, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. अशोक पाटील, माजी सरपंच अप्पासाहेब धनवडे, माजी पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, ग्रामस्थ कार्यकर्ते व महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थितीत होते.
Previous ArticleWHO भारतात उभारणार पारंपरिक औषधांचे जागतिक केंद्र
Next Article १२० दिवसांच्या पेरणीसाठी पाणीपुरवठा होईल









