प्रतिनिधी / सातारा :
शहरातील गडकर आळीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली. मुलीच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. पालकांनी या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करून कोणाबद्दलही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले आहे.
अल्पवयीन मुले-मुली, तरूण यांच्या आत्महत्येच्या घटना दिवसेंदिवस वाढल्या आहेत. अनेक करणामुळे मुलांच्या मनावर येणारा ताण यांचे मुख्य कारण असते. परंतु काही घटनांचे कारण अस्पष्टच असते. अशीच घटना शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गडकर आळीत घडली. शुक्रवारी एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेतला. तिला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ पोलीसांना यांची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली असता ती मयत झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत पालकांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात कोणाविरूद्ध तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.









