प्रतिनिधी / सातारा :
शहरातील गडकरआळी येथील शिवदर्शन कॉलनीत असणाऱ्या मंगलमूर्ती रेसिडन्सी येथे विनायक अशोक जाधव यांच्या बंद घराचे कडीकोयंडे उचकटून अज्ञाताने घरातील 11 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की विनायक अशोक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याने मंगलमूर्ती रेसीडन्सीमधील घराच्या टेरेसच्या दरवाजाचे कडीकोयंडे उचकटुन दि. 20 जुलै रात्री 11.30 ते 6 ऑगस्ट दुपारी 2 या दरम्यानच्या कालावधीत आत शिरले. दुसऱ्या मजल्यावरील लोखंडी कपाटातील दार उघडून लॉकर्समधील 11 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या सहा चमक्या एक बदाम, सोन्याच्या दोन रिंगा, चांदीच्या दोन पैंजण व 4 हजार रुपये रोख असा ऐवज चोरुन नेला. अधिक तपास सहाय्यक फौजदार साबळे करत आहेत.









