प्रतिनिधी / सातारा
सातारा तालुक्यातून इतर तालुक्यात बदलून गेलेले शिक्षकांचे सेवा पुस्तक गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्या टेबलावर कित्येक दिवसापासून पडून आहेत. तसेच सेवा निवृत्त शिक्षकांच्या पेन्शनच्या फायली कार्यलयात धूळ खात पडून आहेत. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी असलेल्या शिक्षक संघटनांना हे प्रश्न दिसत नाहीत. त्यांच्याकडून अन्यायग्रस्त शिक्षकांची बाजू घेण्याऐवजी गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांची बाजू घेतली जात आहे. धुमाळ यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी खासदार, आमदार यांनीच लक्ष घालावे अशी मागणी पीडित शिक्षकांकडून होत आहे.
सातारा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला लाभलेले गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ हे तर्हेवाईक स्वभावाचे आहेत. हे जिल्ह्यातील बहुतांशी शिक्षकांना माहिती आहे. ते पूर्वी फलटणला होते आता साताऱ्यात आल्यापासून त्यांच्या कामकाजात कोणताही बदल झाला नाही. गतवर्षी जे शिक्षक बदलून गेले आहेत. त्यांची अजून सर्व्हिस बुक परत केली नाहीत. कार्यलयातल्या लिपिकांनी ती सर्व्हिस बुक तयार करून त्यांच्या टेबलवर ठेवली आहेत. मात्र, हे महाशय सर्व्हिस बुकवर सहीच करायला मागेनात. गेले आठवड्यात सर्व्हिस बुक नेण्यासाठी शिक्षक इतर तालुक्यातून आले पण त्यांना सर्व्हिस बुक दिले नाहीत. काही तरी कारण सांगून गटशिक्षणाधिकारी धुमाळ हे बाहेर जातात.
त्यांच्या हेकट वागण्याचा फटका बसत आहे. दरम्यान, शिक्षकांच्या प्रश्नावर भांडणाऱ्या दोन मोठ्या संघटनांचे तीन गट जिल्ह्यात कार्यरत आहेत. शिक्षक समिती, शिक्षक संघाच्या संघटनेत दोन गट आहेत. इतर संघटना ह्याही आहेत. यातील एकही संघटनाने शिक्षकांच्या प्रश्नी जाब विचारला नाही.
उलट तरुण भारतने शिक्षकांची बातमी प्रसिद्ध केली की शिक्षक संघटनांच्या नेत्यांकडून चौकशी सुरू होते. अन्यायग्रस्त शिक्षकांची बाजू धरणे लांबच. त्यात गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ हे मूळचे सातारा तालुक्यातील असल्याने राजकीय पाठबळ त्यांना आहे. त्यामुळे अगदी सेवा निवृत्त शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न असेल, मेडिकलचा प्रश्न असेल किंव्हा सर्व्हिस बुकचा हे प्रलंबित ठेवले आहेत. खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनीच अशा गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांची उचलबांगडी करावी अशी मागणी होत आहे.
कोठे गेले शिक्षक नेते
शिक्षकांचे प्रश्न घेऊन भांडणारे शिक्षक नेते सातारा गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्याबाबत चुप्पी साधून गप्प बसतात. त्यांना शिक्षकांच्यावर झालेला अन्याय दिसत नाही. शिक्षक बँकेचे मतदान आले की मात्र शिक्षकांच्या मागे धावतील, त्यांच्याशी गोडगोड बोलतील पण अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवणार नाहीत.पत्रकबाजी करणारे शिक्षक नेते तर गायब झाल्याची चर्चा आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








