ऑनलाईन टीम / पुणे :
तळोजा कारागृहातून सुटल्यावर कारागृह ते पुण्यापर्यंत कुख्यात गुंड गजा मारणे याची मिरवणुक काढली होती. या मिरवणुकीला भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांनी मदत केल्याची माहिती समोर आली असल्याने पुणे पोलीस दलाच्या गुन्हे शाखेने संजय काकडे यांना अटक केली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत गुंड गजा मारणे मिरवणूक काढली. या मिरवणुकीत जवळपास तीनशेहून अधिक चार चाकी वाहने सहभागी झाली होती. या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, राज्यभरात एकच चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर तळोजा ते पुण्यापर्यंत येणार्या पोलीस स्टेशनमध्ये गजा मारणे आणि सहभागी झालेल्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील काही आलिशान गाड्या देखील जप्त केल्या होत्या.
दरम्यान, या गुन्ह्यात संजय काकडे यांना चौकशीसाठी बोलावले होते. बुधवारी सकाळी बंडगार्डन पोलिसांनी काकडे यांना अटक केली आहे.








