
प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित मोहन मोरे पुरस्कृत मोहन मोरे बेळगाव प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत स्पोर्ट्स ऑनचे मालक गजानन जैनोजी हे पाचवे संघमालक ठरले आहेत
मार्चच्या पहिल्या आठवडय़ात होणाऱया या बेळगाव प्रीमियर लीग स्पर्धेत गजानन जैनोजी यांचा संघ स्पोर्ट्स ऑन या नावाने मैदानात उतरणार आहे
गजानन जैनोजी युवा उद्योगपती असून अल्पावधीतच त्यांनी विविध उद्योगांमध्ये यश मिळविले आहे.गजानन स्पोर्ट्स ऑन या नावाने युटय़ूब लाईव्हच्या माध्यमातून हे विविध सामने लोकांपर्यंत लाईव्ह पोहोचवतात. तसेच ते जैनोजी इंजिनिअरिंगचेचे मालक आहेत.
युनियन जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन गजानन जैनोजी यांचे स्वागत केले. यावेळी नगरसेवक रमेश मैलागोळ, रोहित देसाई व चेतन बैलूर आदी मान्यवर उपस्थित होते.
विठ्ठल गवस बीपीएलचे सहावे संघमालक

प्रतिनिधी /बेळगाव
मोहन मोरे पुरस्कृत मोहन मोरे बेळगाव प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत सुपर एक्सप्रेस रोडवेजचे मालक विठ्ठल गवस हे सहावे संघ मालक ठरले. ही स्पर्धा युनियन जिमखानाने आयोजित केली आहे.
विठ्ठल गवस हे याआधी झालेल्या दोन बीपीएलमध्येही संघमालक होते. सुपर एक्सप्रेस रोडवेजचे मालक असलेल्या विठ्ठल गवस यांना क्रिकेटमध्ये आवड असून वेळोवेळी त्यांनी क्रिकेट स्पर्धांना पुरस्कृत केले आहे. गवस यांचा संघ बेळगाव प्रीमियर लीगच्या या आवृत्तीत सुपर एक्सप्रेस युनियन जिमखाना या नावाने मैदानात उतरणार आहे
विठ्ठल गवस यांचे पुष्पगुच्छ देऊन युनियन जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी यांनी स्वागत केले. यावेळी जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठणकर, तसेच जिमखाना संचालक सुहास कुलकर्णी संजय चव्हाण व संजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. बीपीएलच्या या आवृत्तीत आठ संघांनी सहभाग घेतला असून स्पर्धेत 32 सामने होणार आहेत.
बीपीएल क्रिकेट स्पर्धेत, मालिकावीरासाठी ऍडम्स ई-बाईक पुरस्कर्ते
युनियन जिमखाना आयोजित येत्या 5 मार्चपासून सुरू होणाऱया बेळगाव प्रिमियर टी-20 क्रिकेट स्पर्धेची तयारी अंतिम टप्यात असून स्पर्धेतील मालिकावीरासाठी ऍडम्स ई-बाईक पुरस्कर्ते म्हणून लाभले आहेत.
सदर स्पर्धेत 8 संघांनी भाग घेतला असून सामने साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत. मालिकावीर पुरस्कार मिळविणाऱया क्रिकेपटूला ऍडम्स ई-बाईक बक्षीस स्वरूपात देण्यात येणार आहे. पुरस्कर्ते-अशोक तंगडी कंपनीचे अध्यक्ष (एम.डी), उपाध्यक्ष शाहीन सय्यद यांचे युनियन जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे सी ऍण्ड एफ के.एन. कार्लेकर, श्री.के. कार्लेकर, मारूती चौगुले, रोहित देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.









