प्रतिनिधी/ गगनबावडा
मंगळवारी सकाळपासूनच गगनबावडा तालुक्यात परतीचा संततधार पाऊस पडला. दिवसभर जोर कायम राहिल्याने येथील बळीराजाची चिंता वाढली आहे.
आठवड्याच्या उसंतीनंतर मंगळवारी सकाळपासून पुन्हा पावसाने सुरुवात केली. जोराचा पाऊस, दाट धुके,वेगाचा वारा त्यामुळे पुन्हा एकदा मान्सून वातावरण निर्माण झाले. नदी,ओढे,नाले यांची पावसामुळे पाणीपातळी कमालीची वाढली. ग्रामिण भागात खरीप हंगामातील भात,नाचणी, भूईमूग व अन्य पिकांची लोंबे बाहेर पडली आहेत. मात्र यावेळी पावसाची उघडीप गरजेची आहे. पण जोराचा पाऊस सुरु झाल्याने बळीराजाची चिंता अधिक वाढली आहे. ढगाळ वातावरण, अधूनमधून पडणारा पाऊस पिकांवरील किडीला निमंत्रण देणारा आहे. परिणामी या पावसामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होणार आहे. सर्वच बाजूंनी संकटात सापडलेला शेतकरी आता खरीप हंगामदेखील वाया गेल्या तर मोठ्य अडचणीत सापडणार आहे.









