प्रतिनिधी / गगनबावडा
तब्बल २० दिवसांनंतर गगनबावडा तालुक्यात पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी दुपारी अडीच वाजता पश्चिमेकडून पावसाने रिपरिप सुरु केल्याने प्रामुख्याने ग्रामिण भागात शेतकरी वर्गास मोठा दिलासा मिळाला आहे .
इतर नक्षत्रात कमी जास्त पाऊस पडतो. पण म्हातारा नक्षत्रात पाउस मुसळधार पडतो. हा आज पर्यंतचा अंदाज यावेळी खोटा ठरला. पूर्ण नक्षत्र पावसाविना गेले. पाऊस , पाण्याअभावी भात लागण, नाचणी मांडणी ही खरीप हंगामातील काम पूर्णतः खोळंबली होती. भाताचे तरवे तसेच उभे होते. पिके वाळली. खते वाया गेली. खरीप हंगाम पूर्ण वाया जातो की काय अशी भिती निर्माण झाली होती. शेतकरी वर्गास याचा मोठा फटका बसला आहे. शेतकरी वर्ग चातकासारखा पावसाची वाट पाहत होता. रविवारी दुपारी गगनबावडा तालुक्यात रविवारी दुपारी पावसाने रिपरिप सुरु केली आहे. पिकांना जिवदान मिळणार आहे. शेतकरी वर्गास यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








