प्रतिनिधी/गगनबावडा
गगनबावडा तालुक्यातील साळवण येथील मंडलअधिकारी यांचा कोरोना अहवाल पाॅजिटीव्ह आला आहे. मंगळवारी सकाळी त्यांचा अहवाल आला आहे.सी.पी.आर.कोरोना सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ताप, सर्दी या आजाराने चार दिवस ते कार्यालयात आलेले नव्हते. त्यापूर्वी त्यांच्या संपर्कात आलेल्या १६ जणांना गगनबावडा येथील कोरोना सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे.यापूर्वी पोलीस ठाणे, वनविभाग तर आता महसूल अशा शासकिय कार्यालयातील अधिकारी कोरोनाबाधित निघाल्याने चिंता वाढली आहे. प्रशासकिय विभागाच्यावतीने जनजाग्रुती, खबरदारी घेतली जात आहे.








