प्रतिनिधी / गगनबावडा
कोनोली पैकी कुपलेवाडी ता. राधानगरी येथे भूस्खलन होऊन दोन घरे जमिनदोस्त झाली. रात्री १२ वाजता ही घटना घडली. एक पुरुष एक महिला पाच जनावरे ढिगाऱ्याखाली सापडले आहेत.
अतिवृष्टीमुळे झालेल्या पावसाने कोनोली पैकी कुपलेवाडी येथे डोंगराचे भूस्खलन होऊन कोसळलेल्या भरावात दोन घरे पूर्णता तर तीन घरे अंशता जमिनदोस्त झाली आहेत. एका घरातील पती पत्नी, वसंत लहू कुपले (वय ५२ वर्षे) सुसाबाई वसंत कुपले (वय ४७ वर्षे) हे मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडले आहेत. तसेच पाच जनावरे ढिगाऱ्याखाली सापडली आहेत. ही घटना समजताच सकाळी ग्रामस्थांनी टाहो फोडला. एका रात्रीत होत्याचे नव्हते झाल्याने हळहळ व्यक्त केली.
Previous Articleलोकमान्य टिळक दूरदृष्टीचे नेते
Next Article बेकिनकेरे-उचगाव मार्गावर झाड कोसळले









