प्रतिनिधी / गगनबावडा
पंचवार्षिक निवडणूक मुदत संपलेल्या गगनबावडा तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींचा कारभार आता प्रशासक पाहणार आहेत. येत्या स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण यांच्या हस्ते होणार आहे.
गगनबावडा तालुक्यातील एकूण २९ ग्रामपंचायतीपैकी आठ ग्रामपंचायतींची मुदत ४ व ७ ऑगस्ट पासून संपली आहे. कोरोना या जागतिक संकटाच्या पार्श्र्वभूमीवर या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूका बेमुदत कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामूळे या मुदतबाह्य ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत चालण्यासाठी पंचायत समितीकडील अधिकारी प्रशासक म्हणून नेमले आहेत.
गाव निहाय प्रशासक पुढीलप्रमाणे
गगनबावडा – एस. ए. गायकवाड (कृषी विस्तार अधिकारी)
लोंघे – सौ. एस. एस. जाधव (पर्यवेक्षिका महिला व बालकल्याण)
सांगशी व वेतवडे – के. ए. टोणपे (विस्तार अधिकारी पंचायत)
असंडोली व मुटकेश्वर – एम. एस. दाभाडे (कृषी विस्तार अधिकारी)
किरवे – एम. एम. पालेकर (पर्यवेक्षिका महिला व बालकल्याण)
आठ पैकी गगनबावडा व लोंढे या दोन ग्रामपंचायतींची मुदत ४ ऑगस्ट तर उर्वरीतांची ७ ऑगस्टला मुदत संपली आहे.