प्रतिनिधी / गगनबावडा
माजी सरपंच एम.जी.पाटील यांनी गगनबावडा येथील कोरोना सेंटरमधील रुग्णांना साहित्य वाटप करुन माणुसकीचे दर्शन घडविले.
गेल्या आठवडाभर गगनबावडा तालुक्यास मुसळधार पावसाने झोडपले. या काळात मुख्य मार्गावरील झाडे ठिकठिकाणी उन्मळून पडली होती. नदीकाठ पाण्याखाली होता. तब्बल सहा दिवस तालुका अंधारात होता. जनजिवन विस्कळित झाले होते.
गगनबावडा या तालुक्याच्या ठिकाणी हिच परिस्थिती होती. येथील कोरोना सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांना चांगलाच फटका बसला. वीज नाही, पाणी नाही, वेळेवर सोय नाही. अशावेळी धुंदवडे येथील माजी सरपंच एम.जी.पाटील यांनी रुग्णांना मोफत साहित्य वाटप केले. यावेळी उपसरपंच यासिन म्हालदार, सर्जेराव पाटील, संभाजी पाटील इत्यादी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








