पोलीस अधीक्षकांची धडक कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
शहरात गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीतील दोन जणांना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. संजय पवार (वय 22, रा. नामदेववाडी झोपडपट्टी सातारा) व आशुतोष भोसले (वय 23, रा. शाहूनगर गोडोली) असे त्याची नाव आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संजय पवार व आशुतोष भोसले यांनी चोरी, विनयभंग करणे, अपहरण करणे, शिवीगाळ करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक व शारीरिक नुकसान झाले आहे. त्यांना सुधारण्याची संधी देऊनही त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. यामुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी तडीपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे सादर केला. त्यांनी या दोघांना दोन वर्षाकरीता सातारा जिह्यातून तडीपार करण्याचा आदेश केला आहे. पोलीस अधीक्षक शेख यांनी तडीपारच्या चार प्रस्तावात 11 इसमांना तडीपारचे आदेश केलेले आहेत.








