प्रतिनिधी / कोल्हापूर
मनमोहून जाईल अशी विविध रंगातील फुले त्यांचा सुगंध, शोभेची झाडे अन् त्याच्या जोडीला पुष्परचनेचे कौशल्य रविवारी करवीरकरांना अनुभवायला मिळाला. निमित्त 50 व्या पुष्प स्पर्धेचे. कृषी महाविद्यालय व गार्डन क्लब यांच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेमर्ध्ये शेकडो प्रकारातील फुलांची मांडणी केली होती. टाकाऊपासूनचा टिकाऊचा संदेश देत शितपेयांच्या बाटल्यांमध्ये असंख्य प्रकारातील फुले ठेवून सजावट केली होती. फुलांचा राजा गुलाबासह जरबेरा, कर्दळ, निशिगंध, शेवंती, सूर्यफुल, जास्वंद, डेझी, बेसल, सालकिया, आदीं विविध प्रकारातील फुलांची मांडणी स्पर्धचे आकर्षण वाढवत होते.