प्रतिनिधी/ बेळगाव
गँगवाडी येथील एका महिलेवर शनिवारी दुपारी चाकूहल्ला झाला आहे. जखमी महिलेवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून त्याच परिसरातील दोघा जणांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले.
अनिता दादू चौगुले (वय 42) रा. गँगवाडी असे जखमी महिलेचे नाव आहे. यासंबंधी शनिवारी रात्री माळमारुती पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता चाकूहल्ल्याची घटना घडली आहे. मात्र, यासंबंधी एफआयआर दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.









