प्रतिनिधी / म्हापसा
खोर्ली येथे राहणारा प्रकाश आरोलकर (38) हा युवक कौले शाकारण्यासाठी घरावर चढला असता वरून गेलेल्या वीजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे शॉक लागून ठार झाला.
शॉक लागल्यानंतर तो छप्परावरून खाली कोसळला. त्याला त्वरित म्हापसा ऑझिलो इस्पितळात आणण्यात आले असता डय़ुटीवरील डॉक्टरांनी मृत घोषित केले. उपनिरीक्षक विराज कोरगावकर यांनी पंचनामा करून मृतदेह चिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवून दिला.









