जिल्हाधिकाऱयांचा इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणीही खोटय़ा बातम्या पसरविल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे.
केवळ निवडणुकीपुरतेच नाही तर इतर वेळीही कोणीही खोटय़ा बातम्या पसरविल्या तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असे त्यांनी सांगितले.
कोणतीही बातमी टाकताना त्याची पडताळणी करणे गरजेचे आहे. याबाबत कायदा काय सांगतो, या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा झाली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अनेक खोटय़ा बातम्या टाकल्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे जनता गोंधळात राहते, अफवा पसरविल्या जातात. त्यामुळे अनुचित घटना घडत असतात. यामुळे समाजाचे मोठे नुकसान होते. तेव्हा प्रत्येकाने बातमी शेअर करताना त्याची शहानिशा करणे महत्त्वाचे आहे. असेही त्यांनी सांगितले.
सोमवारी कार्यशाळा पार पडली. यावेळी कायदा काय आहे, गुन्हा कोणत्या कोणत्या खोटय़ा बातम्यांबाबत दाखल होऊ शकतो, याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यशाळेला सोशल मिडीयाचे विविध प्रतिनिधी उपस्थित होते.









