वार्ताहर / खोची
खोची ता.हातकणंगले येथील संतोष सदाशिव सपकाळ (वय वर्षे ३९) या युवकाने दारूच्या नशेत कीटकनाशक प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे सदर घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली असून सदर घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली असून ते पुढील तपास करीत आहेत. सीपीआर रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याच्यावर खोची येथेे अत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुले, आई,वडील,पुतणे असा परिवार आहे.
Previous Articleड्रॅग रॅकेट: अभिनेत्री संजनाला भेटलो नाही: आमदार जमीर अहमद
Next Article सोलापूर शहरात आज 77 पॉझिटीव्ह तर एकाचा मृत्यू









