क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावची सुवर्णकन्या आणि हलगा येथील रहिवासी अक्षता बसवंत कामती हिने गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत अविस्मरणीय कामगिरी करताना वेटलिफ्टिंगमध्ये 81 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळविले.
सलग दुसऱया वषी तिने हे सुवर्णयश मिळविले आहे. कोलकाता येथे होणाऱया वरि÷ांच्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ती भाग घेणार आहे. मागील वषी पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात झालेल्या खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेत 76 किलो वजनी गटात 176 किलो वजन उचलून नवीन विक्रम नोंदविला होता. अक्षताने आतापर्यंत पाच राष्ट्रीय स्पर्धेतून पदके संपादन केली आहेत. वरि÷ांच्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत दोन पदके संपादन केली आहेत.
अक्षता कामतीच्या या कामगिरीची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात तिचे खास कौतुक केले होते. हलगा येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अक्षताने वेटलिफ्टिंगसारख्या खेळात सातत्यपूर्णपणे यशस्वी घोडदौड सुरु ठेवली आहे. ती सध्या बेंगळूरमधील साई स्पोर्टस् हॉस्टेलमध्ये सराव करीत असून प्रशिक्षक शामला शेट्टी, रणजीत व बेळगावचे वेटलिफ्टिंग प्रशिक्षक सदानंद मालशेट्टी यांचे तिला मार्गदर्शन लाभत आहे.









