रुग्णवाहिकेचे लोकार्पण, कोविड सेंटरचेही होणार उद्धाटन
प्रतिनिधी / खेड
खेड नगरपरिषद हद्दीतील कोरोनाबाधित रुग्णांसह नजिकच्या ग्रामीण भागातील रुग्णांच्या उपचारासाठी नगरपरिषद
दवाखान्यात कोविड सेंटरची निर्मिती करण्यात येणार आहे. या कोविड सेंटरचे उद्घाटन १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता
करण्यात येणार आहे. याचवेळी खेड नगरपरिषदेसाठी उपलब्ध झालेल्या कार्डियाक रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळाही होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिली.
शहरासह ग्रामिण भागात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाडत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांसाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात व लेवल येथील घरडा महाविद्यालयात कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय दोन पेड कोविडचाही समावेश आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पाश्नर्वभूमीवर येथील नगरपरिषद दवाखान्यातही कोविड सेंटरची निर्मिती करणयाचा निर्णय घेण्यात आला आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या असुन कोरोनाबाधित रुग्णांची सोय होणार आहे.
यावेळी कौस्तुभ बुटाला यांच्या माध्यमातुन सी. एस. आर. फंडातुन नगरपरिषदेसाठी कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. कोरोनाच्या संकटकाळात कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध झाली आहे. हा सोहळा लोकार्पण प्रसंगी खा. सुनील तटकरे, विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे आमदार योगेश कदम,उद्योजक कौस्तुभ बुटाला माजी आमदार अनिकेत संजय कदम आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.









