प्रतिनिधी / खेड
शहरातील द. ग. तटकरे सभागृहानजीक मटका अड्डा सुरू असल्याची कुणकुण लागताच येथील पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत २५०७ रूपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. बेकायदेशीररित्या मटका अड्डा चालवल्याप्रकरणी अमित अनंत खेडेकर (रा. समर्थनगर) याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस शिपाई अजय कडू आदींच्या पथकाने ही धाड टाकली. शहरासह भरणे परिसरात छुप्या पद्धतीने चालवण्यात येणाऱ्या मटक्या अड्यांवर येथील पोलिसांनी धाडसत्र सुरू केल्याने संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या या कारवाईबाबत नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.









