तळेतील दोन महिन्याच्या बालकाचाही समावेश, आठवडाभरानंतर प्रशासन हादरले, कोरोनाबाधितांची संख्या ४६ वर पोहचली
प्रतिनिधी/खेड
गेल्या आठवडाभरात तालुक्यात एकही कोरोनाबाधित रूग्ण न आढळल्याने प्रशासकीय यंत्रणानी सुटकेचा निःश्वास टाकला होता. गुरुवारी रात्री ६ जणांचा प्राप्त झालेला अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणांची झोप उडाली आहे. कोरोनाबाधितांमध्ये कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील परिचारिकेसह तळे शिगवणवाडीतील दोन महिन्याच्या बालकाचाही समावेश आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा आरोग्य प्रशासनाकडून शोध सुरू असून तळे परिसरात कन्टेनमेंट झोन जाहीर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४६ वर पोहचली आहे.
Previous Articleवाळवा तालुक्यात महिला, युवती कोरोना पॉझिटिव्ह
Next Article ईपीएफओचा पेन्शनधारकांना मोठा दिलासा









