प्रतिनिधी / खेड
शहरातील शिवाजी चौक येथील अल मदिना बिर्याणी कॅटरर्सचे दुकान फोडून अज्ञाताने १ लाख २६ हजारांची सेकंड ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल असा १ लाख ३१ हजाराचा ऐवज लंपास केल्याची बाब गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी दुकानाचे मालक नबी मुशरफ खान ( सध्या शिवाजीचौक, मूळगाव उत्तरप्रदेश ) यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. त्यानुसार वाहजर छोटू खान (सध्या पोत्रिक मोहल्ला, मूळगाव उत्तरप्रदेश ) या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









