प्रतिनिधी/ खेड
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तालुक्यात अडकलेल्या परप्रांतिय मजुरांना त्यांच्या प्रांतात जाण्यासाठी पनवेलपर्यंत प्रशासनाने एस.टी. बसची सोय उपलब्ध दिली आहे. त्यानुसार येथील बसस्थानकातून सकाळी 9 ते 11 या वेळेत 9 बसेस पनवेलपर्यंत सोडण्यात आल्या. या बसेसमधून 190 जणांनी प्रवास केल्याची माहिती आगारप्रमुख प्रकाश करवंदे यांनी दिली.
तालुक्यातील 169 मजुरांचा समावेश असून गुहागर 3, दापोली 5, मंडणगड 3 जणांनीही येथील बसस्थानकातून सुटलेल्या बसेसमधून मंडणगड गाठले. अन्य तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेशातील मजुरांना येथील बसस्थानकातून सुटलेल्या बसेसमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती.









