ऑनलाईन टीम
पॅन कार्ड आधारला लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. आता 30 जून 2021 पर्यंत पॅन आधारला लिंक करता येणार आहे. ही मुदत आज दि. 31 मार्च रोजी संपत होती. त्यामुळे सकाळपासूनच आधार आणि पॅन लिंक करण्याची धांदल सर्वत्र सुरू होती. मात्र, सर्व्हर डाऊनच्या समस्येने सर्वांची चिंता वाढवली होती.
दरम्यान, पूर्वी पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत देण्यात आली होती. हे दोन्ही वेळेत लिंक न केल्यास 1 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली होती. आज अनेकांचे आधार आणि पॅन लिंक न झाल्याने चिंता वाढली होती. मात्र, मुदत वाढवल्यामुळे दिलासा मिळाला आहे. याबाबत आयकर विभागाने ट्विट करून माहिती दिली आहे.
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यात 81 नवे रूग्ण, 80 कोरोनामुक्त
Next Article ‘इस्लामपुरचा विकास रोखण्याचे विकास आघाडीचे षडयंत्र’









