1 सप्टेंबरला होणार प्रदर्शित
समांथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांचा बहुचर्चित चित्रपट ‘खुशी’चे नवे पोस्टर जारी करण्यात आले आहे. ‘खुशी’ हा रोमँटिक धाटणीचा चित्रपट असून तो तेलगू भाषेत 1 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘खुशी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवा निर्वाण यांनी केले आहे. समांथा अन् विजय देवरकोंडा यांची जोडी दिसून येणारा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी या दोघांनी ‘महानती’ चित्रपटात एकत्र काम केले होते. ‘खुशी 1 सप्टेंबर रोजी पूर्ण प्रेमासोबत’ असे विजयने पोस्टर शेअर करत नमूद पेल आहे. तर समांथाने इन्स्टाग्रामवर या चित्रपटासंबंधी माहिती दिली आहे.
या चित्रपटाचे चित्रिकरण काश्मीरमध्ये पार पडले आहे. चित्रिकरणादरम्यान समांथा ऑटोइम्यून डिसिज मायोसायटिसला सामोरी जात असल्याचे निदान झाले होते. याचमुळे याचे चित्रिकरण रोखण्यात आले होते. मधल्या कालावधीत समांथाने स्वतःवर उपचार करवून घेतले होते. समांथा आता पुन्हा या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू करणार असल्याचे मानले जात आहे. कारण अलिकडेच तिने एका हिंदी वेबसीरिजच्या चित्रिकरणात भाग घेतला आहे.









