ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आणखी एका कोरोना लसीची घोषणा केली आहे. सीरमने अमेरिकन लस निर्माण करणारी कंपनी ‘नोवाव्हॅक्स’ सोबत विकसित केलेली ‘कोव्होवॅक्स’ लस जून 2021 पर्यंत लॉन्च होईल, अशी घोषणा सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी केली आहे.सीरमच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.