ऑनलाईन टीम मुंबई :
ठाकरे सरकारने आंतरजिल्हा प्रवासासाठी ई – पासची अट रद्द केल्यानंतर आता रेल्वे खात्याने देखील एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता उद्यापासून राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. उद्या पासून म्हणजेच 2 सप्टेंबर पासून तिकिटांच्या बुकिंगला सुरुवात केली आहे.

याबाबतची माहिती देण्यासाठी मध्य रेल्वेने पत्रक काढले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, आरक्षण पद्धतीने उद्यापासून रेल्वे सेवा सुरू होत असून सध्या सुरू असलेल्या विशेष प्रवासी रेल्वे गाड्यांमधून हा प्रवास करता येणार आहे. या प्रवासासाठीची तिकिटे प्रवासी रेल्वे स्थानकांवर जाऊन आरक्षित करू शकतील.
ह्या प्रवासी रेल्वे गाड्या लॉक डाऊन च्या काळात बंद करण्यात आल्या होत्या. परंतु आता अनलॉक 4 च्या नियमांनुसार या रेल्वे गाड्या पुन्हा सुरू होत आहेत.








