प्रतिनिधी / वाकरे
गेल्या दहा वर्षात माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी खुपिरेत कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत. खुपिरे म्हणजे संघर्ष आणि या गावाने कष्टाने पिण्याची पाणीपुरवठा योजना पूर्ण केली आहे. आज उठून विकासकामे केली म्हणणाऱ्यांनी गावात विकास कामे कोणी केली, हे गावाला माहित आहे. असा टोला खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी विरोधकांना लगावून ग्रामपंचायतीच्या प्राथमिक शाळेतील कोरोनावर उपचारासाठी
कोविड सेंटरला परवानगी देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.
खुपिरे ( ता. करवीर) येथील चार कोटी रूपयांच्या राष्ट्रीय पेयजल योजना,ज्ञानेश्वर मंडप सभाग्रह, सार्वजनिक विहीर आणि बसस्टॉप उद्घाटन प्रसंगी खासदार मंडलिक बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रदीप नरके होते.
Previous Articleसातारा : वाई बाजारपेठ एक महिन्याने उघडली
Next Article दक्षिण गुजरातमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के








